प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

औरंगाबाद  येथून आलेल्या काही मराठा आरक्षण समर्थक आंदोलकाना मंत्रालयाच्या प्रवेशव्दारावर काळे झेंडे लावण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंत्रालयाच्या बाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार होते, परंतु आंदोलन करण्यापूर्वीच काही मराठा आंदोलकांना मनीष मार्केट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आंदोलक औरंगाबाद परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे.

    मुंबई : औरंगाबाद  येथून आलेल्या काही मराठा आरक्षण समर्थक आंदोलकाना मंत्रालयाच्या प्रवेशव्दारावर काळे झेंडे लावण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंत्रालयाच्या बाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार होते, परंतु आंदोलन करण्यापूर्वीच काही मराठा आंदोलकांना मनीष मार्केट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आंदोलक औरंगाबाद परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे.

    मराठा आरक्षण मुद्यावरून मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. पण पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मराठा आंदोलक मंत्रालयात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसानी तातडीने त्यांचा शोध घेतला. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजात असंतोषाची लाट आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या भूमिकेवर मराठा समाजाकडून तसेच मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून शंका उपस्थित केल्या होत्या. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर आंदोलन करून हे आंदोलक आपला निषेध जाहीर करणार होते. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून, माता रमाबाई पोलीस स्थानक येथे  या आंदोलकांना नेण्यात आले आहे.

    ५ जूनला आंदोलनाचा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडली नसल्यानेच हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप त्यानी राज्य सरकारवर केला आहे. त्याविरोधात ५जूनला मराठा समाजाकडून मोर्चा काढला जाईल, असा इशारा विनायक मेटे यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र मराठा समाजाने कोरोना काळात कोणतेही मोर्चे काढू नयेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, पुढील कायदेशीर लढाईसाठी राज्यसरकार तयार असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून मराठा समाजाला आवाहन करण्यात आले आहे.