रायगड जिल्ह्यात कोरोंनाचे रविवारी  २३ नवीन रुग्ण ; दोघांचा  मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवार ७ जून रोजी २३ नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात १९ , पनवेल ग्रामीण

पनवेल  : रायगड जिल्ह्यात  रविवार ७ जून  रोजी २३ नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात १९ , पनवेल ग्रामीण मध्ये ३ आणि कर्जत  मध्ये  एक रुग्ण सापडला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आज दोघांचा  मृत्यू झाला आहे .रायगड जिल्ह्यात  कोरोंनाच्या रुग्णांची  एकूण संख्या १४०९  झाली असून  जिल्ह्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.                    

        रायगड जिल्ह्यात रविवारी  कोरोंनाचे २३  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात २२ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात 19  नवीन रुग्ण सापडले आहेत. आज नवीन पनवेल सेक्टर १० शिव सोनेरी  सोसायटीतील ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यालापूर्वी पासून मधुमेहाचा आजार होता. कामोठे सेक्टर २५ येथील एका ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू २९ मे रोजी झाला होता . त्याची माहिती आज देण्यात आली. कर्जत मध्ये ही एक नवीन रुग्ण सापडला आहे 

   रायगड जिल्ह्यात रविवार पर्यंत  ४५५२  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १४०९  पॉझिटिव्ह आल्या आहेत ५६  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर ८७०  जणांनी मात केली असून ४७७   रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात  ६२ जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.