कंगना प्रकरणानंतर मुंबई पालिका कायदा अधिकाऱ्यांच्या शोधात

अभिनेत्री कंगना प्रकरणात पालिकेची नाचक्की झाल्यानंतर आता संयुक्त कायदा अधिकाऱ्याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. गेल्या वर्षभरापासून या विभागातील तीन पदे रिक्त आहेत. अभिनेत्री कंगणाच्या वांद्रे पाली हिल येथील मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यलयातील बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. कंगनाने उच्च न्यायालयात याविरोधात धाव घेत, पालिकेची कारवाई सूडबुध्दीची आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी न्यायमुर्ती एस. जे.काथावाला आणि न्यायमूर्ती आर आय. छागला यांच्या खंडपीठापुढे केली.

मुंबई (Mumbai).  अभिनेत्री कंगना प्रकरणात पालिकेची नाचक्की झाल्यानंतर आता संयुक्त कायदा अधिकाऱ्याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. गेल्या वर्षभरापासून या विभागातील तीन पदे रिक्त आहेत. अभिनेत्री कंगणाच्या वांद्रे पाली हिल येथील मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यलयातील बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. कंगनाने उच्च न्यायालयात याविरोधात धाव घेत, पालिकेची कारवाई सूडबुध्दीची आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी न्यायमुर्ती एस. जे.काथावाला आणि न्यायमूर्ती आर आय. छागला यांच्या खंडपीठापुढे केली.

उच्च न्यायालयाने यावर निकाल देताना, पालिकेच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढताना आकसापोटी कंगनाच्या मालमत्तेवर कारवाई झाल्याचे मत नोंदवले. तसेच अभिनेत्रींच्या मालमत्तेवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करणे हे नागरिकांच्या हक्काच्या विरोधी असल्याचेही म्हटले होते. पालिका प्रशासनाने न्यायालयाने ताशेरे ओढल्यामुळे कायदा विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे कायदा विभागाला खडबडून जाग आली असून विधी विभागात संयुक्त कायदा अधिकारी ही तीन पदे भरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या वर्ष भरापासून ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील एक पद आणि खुल्या प्रवर्गातील दोन पदे भरली जाणार आहेत. तसा प्रस्ताव पालिकेच्या विधी समितीत मंजुरीसाठी आला आहे. लवकरच या प्रस्तावाला विधी समितीची मंजुरी मिळणार आहे.

अशी असेल नियुक्ती
ही पदे सहा महिन्याच्या कालावधीसाठी असतील. त्यांना मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहमती घ्यावी लागेल. कायदा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पदोन्नती हे विषय न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाच्या अधीन राहूनच भरली जातील. तसेच सेवा ज्येष्ठतेला यात प्राधान्य दिले जाईल.