Bruhan Mumbai.jpg (1200)

आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात ३,५३,८९५ चाचण्या तर मार्च ते सप्टेंबर दरम्यान ११,२९,८६९ घेण्यात आल्या. सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी ११,७९६ चाचण्यात घेण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सुमारे ४००० चाचण्या जास्त घेण्यात येत आहे.

मुंबई : मुंबई महानगर पालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये (September Corona Test) कोविड-१९ मुळे मुंबईत सरासरी दिवसाला ४२ कोरोना रुग्णांचा मृत्यू (Corona Death rate) झाल्याची नोंद केली आहे. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) कोविड जम्बो सेंटर (Jumbo covid centre) येथील कोरोना चाचण्या आणि रुग्णांच्या बेडची संख्या वाढवली आहे. परंतु शहरात अजूनही मृत्यूंची संख्या ४.३५ टक्क्यांच्या उच्चपातळीवर आहे.

आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात ३,५३,८९५ चाचण्या तर मार्च ते सप्टेंबर दरम्यान ११,२९,८६९ घेण्यात आल्या. सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी ११,७९६ चाचण्यात घेण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सुमारे ४००० चाचण्या जास्त घेण्यात येत आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना चाचण्या वाढविण्यात र्जाय सरकारच्या अपयशाबद्दल चिंत व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर लक्ष देणे तातडीचे आहे. असे सांगितलं असल्याचे ते म्हणाले. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना गेल्या ५ महिन्यांत १० पेक्षा अधिक पत्र लिहून कोरोना विषयी आणि चाचण्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबईत राज्यापेक्षा कोविड-१९ ची दैनंदिन सरासरी केवळ ११.७९६ आहे. ऑगस्टमध्ये संक्रमणाचे प्रमाण १३.६३ टक्क्यांवरुन सप्टेंबरमध्ये १७.५० टक्क्यांवर गेले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही दररोजच्या चाचण्यांमध्ये ४०,०००ची वाढ झाली आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

भाजपचे आमदार अमित साटम यांनीही पालिकेचे प्रमुख इक्बालसिंग चहल यांना पत्र लिहून आरटी-पीसीआर चाचणी वाढवण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेने सादर केलेल्या अवहालानुसार सप्टेंबरमध्ये दिवसाला ४२ रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ऑगस्ट सारखेच आहे. यावरुन असे दिसून येते की बीएमसीने चाचण्या वाढवून सप्टेंबरमध्ये मृत्यूचे प्रमाण कृत्रिमरित्या खाली आणले आहे. दिवसाला ४० रुग्णांचा मृत्यू म्हणजे मृत्यूचे प्रमाण खूपच जास्त आहे.

राज्य अनलॉक झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांना मोकळीक मिळाली आहे. आणि संपर्क ट्रेसिंग बंद केले आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उपाययोजना पुन्ही सुरु करणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेने चाचण्या वाढवल्या पाहिजेत तसेच मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे याचा देखील तपास केला पाहिजे.

यावर मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, मागील ४५ दिवसांपासून मृत्यूची सरासरी संख्या २ टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणूनच एकूण मृत्यू दर आता ९.९ टक्क्यांवरुन ४.३५ टक्क्यांवर आला आहे. तसेच मुंबईतील कोरोना संसर्ग प्रमाण २८ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर आले आहे.

तसेच सप्टेंबरमध्ये मुंबईत घेण्यात आलेल्या सरासरी आरटी-पीसीआर चाचण्या कमाल क्षमतेच्या ९५०० च्या वर पोहोचल्या आहेत. आम्ही संख्या मर्यादित केली आहे. प्रतिजैविक चाचण्या आयोजित केली जात आहे. दिवसाच्या १२,००० चाचण्यांपैकी आम्ही ९५०० चाचण्या आरटी-पीसीआर चाचण्या आणि काही प्रतिजैविक चाचण्या घेत आहोत. दिल्लीत ४०००० चाचण्या घेण्यात घेत आहेत. पण त्यातील बहुतेक अँटीजेन चाचण्या आहेत. आम्ही सप्टेंबरमध्ये मृत्यूचे प्रमाण केवळ दोन टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे.