महाराष्ट्र पोलीस कोरोनाच्या विळख्यात; १६ हजार १५ पोलिसांना कोरोनाची लागण

गेल्या २४ तासांत ४२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर धक्कादायक म्हणजे पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांच्या मृत्यूचा आकडा हा १६३ वर पोहोचला आहे.

 मुंबई : राज्यात दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्र पोलीस कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या २४ तासांत ४२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर धक्कादायक म्हणजे पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांच्या मृत्यूचा आकडा हा १६३ वर पोहोचला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची दहशत वाढताना दिसत आहे.

राज्यभरात १६ हजार १५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात, १ हजार ७३६ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर यापैकी १३२६ पोलीस अधिकारी आणि ११६८८ पोलीस कर्मचारी असे एकूण १३ हजार १४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ठाणे, नवी मुंबई, नागपुर ग्रामीण, नांदेड़ आणि वर्धा येथील पोलिसांचा समावेश आहे.

जूनपासून सुरु झालेल्या अनलॉकच्या टप्प्यामुळे राहदारी वाढली. यात रस्त्यावर उभ राहून ऑन ड्यूटी २४ तास असणाऱ्या पोलिसांचा नागरिकांशी संपर्क वाढला. त्यामुळे पोलिसांभोवतीचे संकट वाढत असल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांचे म्हणणे आहे.