सद्य स्थितीत पवार साहेबांनी पुढाकार घेणे गरजेचे : संभाजी राजेंनी घेतली शरद पवारांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खासदार संभाजीराजें छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सिल्वर ओकवर (Silver Oak) जावून भेट घेतली. संभाजी राजे सिल्वर ओकवर येण्याआधी सकाळी साडेआठ वाजता अजित पवार (Ajit Pawar) आणि नऊ वाजता दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि जयंत पाटील (Jayant Patil) देखील सिल्वर ओक वर पोहचले होते.

  मुंबई (Mumbai).  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खासदार संभाजीराजें छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सिल्वर ओकवर (Silver Oak) जावून भेट घेतली. संभाजी राजे सिल्वर ओकवर येण्याआधी सकाळी साडेआठ वाजता अजित पवार (Ajit Pawar) आणि नऊ वाजता दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि जयंत पाटील (Jayant Patil) देखील सिल्वर ओक वर पोहचले होते.

  मराठा समाज अस्वस्थ, दु:खी आहे
  संभाजी राजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते मराठा समाजातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेत आहेत. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खा संभाजी राजे म्हणाले की, मराठा समाज किती अस्वस्थ आहे, दु:खी आहे, ते मी पवार साहेबांना सांगितले.

  सद्य स्थितीत पवारसाहेबांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मी त्यांना सांगितले. पवारसाहेब, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, अजितदादा या सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, ही सकल मराठा समाजाच्यावतीने मी मागणी केली” ---- खा संभाजी राजे छत्रपती.

   एकूणच चर्चा सकारात्मक
  ते म्हणाले की, ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या हातात आहेत, त्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज नाही, त्याबद्दल मी शरद पवारांशी चर्चा केली. एकूणच चर्चा सकारात्मक झाल्याचे संभाजी राजेंनी सांगितले. संभाजी राजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते मराठा समाजातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेत आहेत.