कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात रुग्ण मृत्यू संख्या शंभर ट्क्के वाढल्याची आकडेवारी उपलब्ध; शहरी भागांपेक्षा ग्रामिण भागात अधिक जिवीतहानी

राज्यात रुग्ण मृत्यू संख्या शंभर ट्क्के वाढल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या पहिल्या लाटेतील रूग्णसंख्या आणि मृत्यूंच्या तुलनेत हा वाढल्याचे दिसून येत आहे.  त्यातही शहरी भागापेक्षा ग्रामिण भागात मृत्यूदर वाढल्याचे दिसून आले आहे.

  मुंबई : राज्यात बहुसंख्य भागात कोरोनाच्या दुस-या लाटेचा प्रभाव ओसरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या लाटेमध्ये राज्यात रुग्ण मृत्यू संख्या शंभर ट्क्के वाढल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या पहिल्या लाटेतील रूग्णसंख्या आणि मृत्यूंच्या तुलनेत हा वाढल्याचे दिसून येत आहे.  त्यातही शहरी भागापेक्षा ग्रामिण भागात मृत्यूदर वाढल्याचे दिसून आले आहे.

  ११जिल्ह्यात शंभर टक्के मृत्यूदर

  या माहितीनुसार गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेला १९.३२ लाख नागरीक बळी पडले तर यावेळी हेच प्रमाण ३६.६९ लाख इतके म्हणजे जवळपास दुपटी इतके झाले आहे. याशिवाय आता पर्यंत उपलब्ध माहितीनुसार मृत्य़ूंची संख्या मागील वर्षी ४९५२१ इतकी होती. तर यंदा केवळ पहिल्या पाच महिन्यात ३९६९१ इतक्या रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. एकूण २१ कोरोना प्रभावित जिल्ह्यांपैकी ११जिल्ह्यात शंभर टक्के इतका मृत्यूदर नोंदविण्यात आला आहे. सर्वाधिक मृत्यूसंख्येची

  ग्रामिण भागात मृत्यूदर सर्वाधिक

  आकडेवारी पाहिली तर चंद्रपूर मध्ये मागच्या पेक्षा दुप्पट मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात २३२४५ कोरोना रूग्ण सापडले आणि ३८९ जणांचा मृत्यू झाला तर यंदा ६१३९० रूग्ण सापडले तर मृत्यू पावलेल्यांची संख्या ९४९ इतकी वाढली आहे. अशीच स्थिती अमरावती जिल्ह्यातही पहायला मिळत आहे. येथे पहिल्या लाटेमध्ये ३८१ मृत्य़ू झाले होते तर दुस-या लाटेमध्ये आता पर्यंत ९५१ झाले आहेत.अश्याच प्रकारे सिंधुदूर्ग, वाशिम गोंदिया वर्धा नांदेड, हिंगोली परभणी या जिल्ह्यात कोरोना बळीची संख्या दुप्पट झाल्याचे दिसत आहे.

  शहरी भागात जनजागृतीचा परिणाम

  केईएम रूग्णालयाचे माजी प्रमुख डॉ अविनाश सुपे जे राज्याच्या  एमएमआर मृत्यू लेखापरिक्षण समितीचे सदस्य आहेत, त्यांच्या मते काही जिल्ह्यांना कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. हे मृत्यू २ – ३ आठवड्याच्या काळात वाढल्याचे दिसून आले आहे.ज्यांची संपूर्ण माहिती आणि वर्गीकरण अद्याप केले जात आहे. या मध्ये ग्रामिण जिल्ह्यांच्या तुलनेत यावेळी शहरी जिल्ह्यात मृत्य़ू दर कमी असल्याचे निरिक्षण देखील नोंदविण्यात आले आहे. मुंबईचे उदाहरण द्यायचे झाले तर मागील वेळी मुंबईत २.९३ लाख कोरोना रुग्ण सापडले त्यातील ११११६ जणांचा मृत्यू झाला होता. तर यावेळी ४.०४लाख कोरोना रुग्ण सापडलेआणि मृत्यू मात्र ३४९७ जणांचा झाला आहे.अश्याच प्रकारे ठाणे पुणे नागपूर या मोठ्या शहरांत मृत्य़ूदर कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. या मागचे कारण सांगताना शहरी भागात कोरोना बाबतची जनजागृती होत असल्याने लोकांनी जास्त काळजी घेतल्याचे  दिसून येत आहे असे आरोग्य सेवेतील सूत्रांचे मत आहे.