राज्यात २४ तासात २३२ पोलीसांना कोरोनाची बाधा

  • कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. त्यामुळे कर्तव्य बजावताना राज्यातील पालीसांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात कोरोनाने राज्यातील हजारहून जास्त पोलीसांना विळखा घातला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २३२ पोलीसांना कोरोनाची बाधा झाली आहे

मुंबई – देशात कोरोनाने धूमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात कोरोनाचा जास्त उद्रेक महाराष्ट्रात झाला आहे. जूनपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. त्यामुळे कर्तव्य बजावताना राज्यातील पालीसांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात कोरोनाने राज्यातील हजारहून जास्त पोलीसांना विळखा घातला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २३२ पोलीसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच आतापर्यंत एकूण ९४४९ पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ९७१ पोलीस अधीकारी आणि ८४७८ पोलीस कर्मचारी आहेत. आता कोरोनावर २१९ पोलीस अधिकारी आणि १७१३ पोलीस कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनामुळे १०३ पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.