राज्यात २४ तासात २८८ पोलिसांना कोरोनाची लागण, २ मृत्यू

राज्यात कोरोनाबाधित पोलीसांची संख्या १३,४६८ वर पोहचली अहे. तसेच २४७८ पोलीस कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. तर १०८५२ पोलीसांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच एकूण मृत्यू झालेल्या पोलीसांची संख्या १३८ आहे. त्यामुळे कोरोना योद्ध्यांची पण कोरोना प्रकरणे वाढताना दिसत आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस पसरतच आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसोबतच कोरोना योद्ध्यांचा देखील समावेश आहे. मागील २४ तासात राज्यात २८८ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. तर २ पोलीसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यूचा आकडा १३८ झाला आहे.

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १३,४६८ वर पोहचली अहे. तसेच २४७८ पोलीस कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. तर १०८५२ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच एकूण मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १३८ आहे. त्यामुळे कोरोना योद्ध्यांची पण कोरोना प्रकरणे वाढताना दिसत आहे.