२०२० वर्षात Deaths In Mumbai १२ टक्क्यांनी वाढले ; प्रजा फाऊंडेशनच्या आरोग्य अहवालाची माहिती

प्रजा फाऊंडेशनकडून मुंबईतील आरोग्याचा परिस्थिती अहवाल (Health Situation Report in Mumbai) मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात आरोग्यविषयक धोरणे आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी निर्धारित सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची उद्दिष्ट्ये मुंबईतील आरोग्य सेवांची परिस्थिती काय आहे याचा लेखाजोखा या अहवालात घेतला आहे.

  मुंबई : मुंबईत २०२० या वर्षभरात एकूण १ लाख १२ हजार ९०६ मृत्यूंची (Deaths In Mumbai) नोंद झाली असून त्यापैकी ११ हजार ११६ म्हणजे १० टक्के मृत्यू हे कोविड मृत्यू (Covid-19 Deaths) आहेत. २०१९ या वर्षात ९१ हजार २२३ कोविडेतर रुग्णांचे मृत्यू होते.  तर २०२० या वर्षात १ लाख १ हजार ९० कोविडेतर मृत्यू झाले.  याचा अर्थ मृत्यू १२ टक्क्यांनी वाढले. मात्र २०२० च्या जानेवारी पासून मृत्यूच्या कारणांचा डेटा त्या त्या वेळी नोंदवला न गेल्याने या मृत्यूंचे कारण काय हे समजू शकले नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेची स्थिती वर्षभरात कमालीची सुधारली आहे (The condition of the BMC health service of the corporation has improved tremendously throughout the year) किंवा महामारीजन्य परिस्थितीतील निर्बंधांमुळे मृत्यूला कारणीभूत आजारांची नोंद करणे शक्य झाले नसावे असे मत प्रजा फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के (Milind Mhaske, Director, Praja Foundation) यांनी नोंदवले आहे.

  प्रजा फाऊंडेशनकडून मुंबईतील आरोग्याचा परिस्थिती अहवाल (Health Situation Report in Mumbai) मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात आरोग्यविषयक धोरणे आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी निर्धारित सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची उद्दिष्ट्ये मुंबईतील आरोग्य सेवांची परिस्थिती काय आहे याचा लेखाजोखा या अहवालात घेतला आहे. तर हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये समाविष्ट असलेल्या मोठ्या आजारांच्या नोंदींनुसार या आजारांचे प्रमाण २०१९ ते २०२० दरम्यान २९ टक्क्याने कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. आरोग्यपूर्ण सवयी आणि स्वास्थ्य जपणे किती महत्त्वाचे आहे हे कोविड-१९ ने लक्षात आणून दिले आहे.

  तसेच आरोग्यविषयक डेटाचे व्यवस्थापन, आरोग्य मनुष्यबळाचे अपेक्षित प्रमाण आणि प्राथमिक आरोग्य सेवेची सक्षम पायाभूत यंत्रणा असण्याचे महत्त्वही या महामारीने अधोरेखित केले असल्याचे प्रजा फाऊंडेशनचे विश्वस्त निताई मेहता यांनी म्हटले. तर हिलीस सेखसरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक मंगेश पेडणेकर यांनी सांगितले की, मुंबईमध्ये आरोग्यासाठीची वित्तीय तरतूद नेहमीच योग्य प्रकारे केली जाते.

  २०२१-२२ च्या एकूण वित्तीय अंदाजपत्रकापैकी १२ टक्के म्हणजेच रू. ३९,०३८.८३ कोटीची तरतूद सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी केलेली आहे. तरीही महामारीच्या काळात सार्वजनिक रूग्णालयांना त्यांच्या कार्यक्षमतेपेक्षा अधिक ताण सहन करावा लागला असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. अद्यापही ३१ टक्के पदे रिक्त असल्याचे त्यांनी म्हटले.

  २०२१-२२ च्या एकूण आरोग्य अंदाजपत्रकांतील केवळ २० टक्के तरतूद मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी करण्यात आली. यात प्राथमिक आरोग्य सेवा देणारे महापालिकेचे दवाखाने, प्रसुती गृहे आणि आरोग्य केंद्रे यांचा समावेश होतो. महापालिकेचे दवाखाने अधिक वेळासाठी चालू असावेत अशी मागणी प्रजा खूप काळापासून करत आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेने प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली असून सध्या १५ ठिकाणी १४ तास सेवा उपलब्ध आहे. हा बदल स्वागतार्ह असून अन्य दवाखान्यातही त्याचा अवलंब करण्याची गरज आहे.

  ठळक मुद्दे :

  •  मृत्यूंचे प्रमाण २०१९ मध्ये ९१ हजार २२३ वरून २०२० वर्षात १ लाख १ हजार ७९० झाले, यात ११ हजार ११६ कोविड मृत्यू समाविष्ट नाहीत.
  • मुंबईत ८५८ सरकारी दवाखान्यांची गरज असता फक्त १९९ सरकारी दवाखाने
  • वैद्यकीय आणि निम्न-वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुक्रमे ४४ आणि ४५ टक्के  मंजूर पदे रिक्त
  • एकूण १८७ दवाखान्यांपैकी केवळ १५ ठिकाणी १४ तास सेवा