टिटवाळ्यात नागरिकांनी खंडित वीज पुरवठ्याप्रश्नी वीज बील जाळत  केला एल्गार

कल्याण : टिटवाळा मांडा परिसरात वारंवार होत असणाऱ्या खंडित वीजपुरवठ्या मुळे वीजेचा लंपडाव सुरु असल्याने सुमारे पन्नास हजार विद्युत ग्राहक त्रस्त झाले असून बहुसंख्य नागरिकांनी

कल्याण :  टिटवाळा मांडा परिसरात वारंवार   होत असणाऱ्या खंडित वीजपुरवठ्या मुळे वीजेचा लंपडाव सुरु असल्याने सुमारे पन्नास हजार विद्युत ग्राहक त्रस्त झाले असून बहुसंख्य नागरिकांनी महावितरणाच्या भोगंळ कारभारा  बाबत आपला असणारा असंतोष खदखदत ठेवून विद्युत बिल जाळून अनोखा निषेध व्यक्त करीत सोशल मीडिया व ट्विटरवर प्रशासनाला पाठवित महावितरणाचा सावळा गोधळ कारभार सुरळीत कधी होणार या कडे महावितरणचे लक्ष वेधले आहे. महावितरणच्या टिटवाळा येथील भोगंळ कारभारामुळे वीज ग्राहकांना वारंवार खंडित वीज पुरवठा होत असल्याने  वीज ग्राहकांमध्ये महावितरण टिटवाळा येथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यां बद्दल प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे.                 

कल्याण तालुका  शिवसेना ग्राहक संरक्षण  कक्ष प्रमुख  विजय देशेकर यांनी यासंदर्भात येथील नागरिकांना विद्युत बिल जाळण्याचे आवाहन केले होते.    व सोशल मिडियाच्या माध्यमातून बील जाळीत  फोटो, व्हिडीओ व्हायरल करीत महावितरणाच्या भोगंळ कारभाराचा निषेध करावा जिणे करून महावितरण दखल घेऊन वीज ग्राहकांची वारंवार खंडित वीज पुरवठ्याच्या ग्रहणातुन टिटवाळा कर वीज ग्राहकांची सुटका होईल    या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून अकार्यक्षम ठरत असलेल्या महावितरण विभागाचे या अनोख्या आंदोलनाने खरे स्वरूप पहावयास मिळाले आहे.

गेल्या काही महिन्यापासून मांडा-टिटवाळा परिसरात विद्युत पुरवठा येणे-जाणे नित्याचे होऊन बसल्याने येथे नागरिकांमध्ये या भोंगळ कारभाराबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे. विद्युत पुरवठा यासंदर्भात किमान शेकडो ग्राहकांच्या तक्रारी ला येथील विद्युत अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. 

लॉक डाऊन च्या कालावधीत विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी आदी बिनधास्त पणे वागत असून त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस म्हणून काल रात्री येथील विद्युत ग्राहकांनी वीज बिल जाळण्याचा कार्यक्रम आयोजित करून मनमानी कारभाराचा याद्वारे निषेध व्यक्त केला आहे. यासंदर्भात महावितरणाने मांडा-टिटवाळा वासियांचा अंत पाहू नये असे आवाहन करून  कल्याण तालुका    शिवसेना  ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख विजय देशेकर यांनी येथील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांची येथून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.