चुकीचा, खोटा, द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक मजकूर; 29 जणांविरोधात तक्रार आणि शिल्पाची कोर्टात धाव

राज कुंद्राच्या अडचणीतही दिवसंदिवसेंदिवस वाढ होत आहे. मालवणी पोलिसस्टेशमध्येही पॉर्न चित्रपट शूटिंग प्रकरणात दाखल असलेली प्रकरणे आता गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आली आहेत. या प्रकरणात कुंद्रा आरोपी नाही तथापि या प्रकरणाच्या चौकशीत कुंद्राचे नाव समोर आल्यास त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पीडित मॉडेल गहना वशिष्ठ आणि अन्य तीन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या तिघांनी चित्रपटात काम देण्याचे आमिष देऊन पॉर्नचित्रपट तयार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

  मुंबई : सोशल मीडिया आणि वेबसाइटसवर आपल्याबद्दल चुकीचा, खोटा, द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून प्रकाशकांना रोखावे, यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात पती राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर प्रसारमाध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत. त्यात बदनामीकारक मजकूर असल्याने शिल्पाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करीत तीने हायकोर्टात मानहानीचा दावा केला आहे. या प्रकरणावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे. अन्य प्रकरणेही गुन्हे शाखेकडे वर्ग

  रोज नवनवी माहिती समोर येत असल्याने राज कुंद्राच्या अडचणीतही दिवसंदिवसेंदिवस वाढ होत आहे. मालवणी पोलिसस्टेशमध्येही पॉर्न चित्रपट शूटिंग प्रकरणात दाखल असलेली प्रकरणे आता गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आली आहेत. या प्रकरणात कुंद्रा आरोपी नाही तथापि या प्रकरणाच्या चौकशीत कुंद्राचे नाव समोर आल्यास त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पीडित मॉडेल गहना वशिष्ठ आणि अन्य तीन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या तिघांनी चित्रपटात काम देण्याचे आमिष देऊन पॉर्नचित्रपट तयार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

  मढ बंगल्यात शूटिंग

  या पॉर्न चित्रपटाचे शूटिंग मालवणीतील मढ येथील बंगल्यात करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून पोलिसांनी कुंद्राभोवती फास आवळला असल्याचे समजते. दुसरीकडे, गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीला या प्रकरणात अद्याप क्लीन चिट दिली नसल्याचीही माहिती दिली. या प्रकरणी तिचा पती राज कुंद्राला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  शर्लिन चोप्रा साक्षीदार!

  या प्रकरणात फॉरेंसिक ऑडिटरची नियुक्ती झाली असून ते या प्रकरणातील सर्व खात्यातील व्यवहारांची माहिती पडताळून पाहत आहत. ही प्रक्रिया मोठी असून जोपर्यंत ऑडिट केले जात नाही तोपर्यंत कोणालाही क्लिन चिट दिली जाणार नसल्याचे समजते. दरम्यान शर्लिन चोप्राला पोलिसांनी साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यास बोलावले असल्याची माहितीदेखील सूत्राने दिली.