महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेचं उद्घाटन ; कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही केले अभिनंदन

आज आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. याबद्दल कुणाचही दुमत असण्याची शक्यता नाही. हेच ते ठिकाण आहे जे कोरोना रुग्णांनी तुडूंब भरून वाहत होतं. मात्र, जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मी मानाचा मजुरा करतो. असं म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही अभिनंदन केले.

मुंबई : महाराष्ट्रातील लसीकरणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (शनिवार) सकाळी ११.३० वाजता मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये झाली. मुंबईमधील एकूण ९ केंद्रांवरील ४० बूथवर लसीकरण केले जाणार आहे. बीकेसीमधी लसीकरण केंद्रावर महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. याबद्दल कुणाचही दुमत असण्याची शक्यता नाही. हेच ते ठिकाण आहे जे कोरोना रुग्णांनी तुडूंब भरून वाहत होतं. मात्र, जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मी मानाचा मजुरा करतो. असं म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही अभिनंदन केले.

कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही अभिनंदन केले.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महाराष्ट्रात २८५ लसीकरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलंय. तसेच महाराष्ट्राला कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे ९.६३ लाख डोसेस आणि कोव्हॅक्सिन लशीचे २० हजार डोसेस मिळाले आहेत. ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचवण्यातही आले आहेत.

आरती ओवाळून लशीच्या डब्यांचं स्वागत

मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये आरती ओवाळून आणि टाळ्यांच्या गजरात कोरोना लस घेऊन येणाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. कूपर हॉस्पिटल लसीकरणाचं केंद्र आहे. तसेच पुण्यातील औंध येतील कोरोना लसीकरण केंद्रात महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रांगोळ्या काढल्या आहेत.