शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयांचे उदघाटन

नवी मुंबईत पाच शाखांचे उदघाटन राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या हस्ते पार पडले. सानपाडा , नेरुळ सेक्टर -८, नेरुळ सेक्टर -१० , कोपर खैरणे, दिघा येथे मनसे शाखांचा उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

    मुंबई (Mumbai).  नवी मुंबईत पाच शाखांचे उदघाटन राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या हस्ते पार पडले. सानपाडा , नेरुळ सेक्टर -८, नेरुळ सेक्टर -१० , कोपर खैरणे, दिघा येथे मनसे शाखांचा उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

    सानपाडा येथे शहर सचिव विलास घोणे, सह सचिव दिनेश पाटील, माजी विभाग अध्यक्ष आनंद चौगुले, विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्या पुढाकाराने सुरु केलेल्या शाखा उदघाटन प्रसंगी मोठ्या संख्येने सानपाडावासीय उपस्थित होते. मनसेचे पदाधिकारी शाखा नसतानासुद्धा चांगले काम करत होते. आता शाखा उघडल्यानंतर जनतेला येथे न्याय मिळेल अशी अपेक्षा शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली. नेरुळ, सेक्टर-८ येथे मनसेच्या विधी विभागाचे शहरसंघटक ऍड. निलेश बागडे, नेरुळ, सेक्टर-१० येथे अमर पाटील तसेच कोपरखैरणे येथे मनसेचे उपविभागअध्यक्ष प्रतिक घालमे व दिघा येथे दत्ता कदम यांच्या शाखेचे उद्धाटन करण्यात आले. त्यानंतर नेरुळ येथील वंडर पार्क येथे मनसेच्या पालिका कर्मचारी सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

    शर्मिला ठाकरे यांनी मनसेच्या माथाडी सेनेच्या गणेश म्हात्रे यांच्या गोठीवलीतील शाखेस आणि विभागअध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या चिंचपाडा येथील शाखेस व विभागअध्यक्ष दिलीप शिर्के यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेस भेट दिली. त्यानंतर यांनी स्थापन केलेल्या शाखेचे उदघाटन केले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे, उपशहराध्यक्ष निलेश बाणखेले, सविनय म्हात्रे, सचिन कदम, संदेश डोंगरे, प्रसाद घोरपडे, संदीप गलगुडे उपस्थित होते.