Western Railways

मुंबई : पश्चिम रेल्वेने(western railway) १५ ऑक्टोबरपासून दहा वातानुकूलित लोकल फेऱ्यांसह एकूण १९४ अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय(decision to increase local railway rounds) घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या एकूण फेऱ्यांची संख्या ५०६ वरुन ७०० इतकी होणार आहे. त्यामुळे लोकल प्रवासात ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्यासाठी मदत होईल.

पश्चिम रेल्वेच्या वाढविण्यात आलेल्या १९४ फेऱ्यांमध्ये सकाळच्या गर्दीतील ४९ आणि संध्याकाळच्या गर्दीतील ४९ फेऱ्यांचा समावेश असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सूमित ठाकूर यांनी सांगितले. वाढविलेल्या १९४ फेऱ्यांमध्ये १० वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश आहे त्यात दोन एसी लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येणार एक फेरी डाऊन दिशेला महालक्ष्मी ते बोरीवली तर एक अप दिशेला बोरीवली ते चर्चगेट अशी चालविण्यात येईल, तर एसी लोकलच्या आठ फेरी जलद मार्गावर चालविण्यात येणार असून चार डाऊन दिशेला चर्चगेट ते विरार तर चार अप दिशेला विरार ते चर्चगेट अशा चालविण्यात येणार आहेत.

१९४ नव्या फेऱ्यांची माहिती

गुरुवारपासून वाढविण्यात आलेल्या १९४ फेऱ्यांमध्ये ५१ फेऱ्या चर्चगेट ते विरार, ९६ फेऱ्या बोरीवली ते चर्चगेट, ९ फेऱ्या भाईंदर ते विरार, १२ फेऱ्या नालासोपारा ते चर्चगेट, ९ फेऱ्या चर्चगेट ते भाईंदर, २ फेऱ्या वस‌ई ते चर्चगेट, ८ फेऱ्या वांद्रे ते बोरीवली, ८ फेऱ्या चर्चगेट ते भाईंदर यादरम्यान वाढविण्यात आल्या आहेत. २८ सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या फेऱ्या ५०० वरुन ५०६ करण्यात आल्या होत्या, त्यात सहा फेऱ्या महिलांसाठी वाढविण्यात आल्या होत्या.