corona in dharavi

मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांत कोरोना रूग्ण सर्वाधिक आढळत आहेत. विशेषत: अंधेरी, मुलुंड, कांदिवली, भांडूप आणि बोरिवली या पाच विभागांमध्ये रूग्णसंख्या जास्त आहे. आता कोरोनाचे दररोज दीड हजारांच्या आसपास रूग्ण आढळत असून मुंबईवर संकट गडद झाले आहे. दादर, धारावी व माहीम या तीन विभागांत गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल ३७२ ने वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दादर, धारावी व माहीम विभागात खास उपाययोजना राबविण्याची आवश्यकता भासणार आहे.

    मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दादर, धारावी व माहीम या तीन विभागांत गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल ३७२ ने वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दादर, धारावी व माहीम विभागात खास उपाययोजना राबविण्याची आवश्यकता भासणार आहे.

    ज्यावेळी धारावी विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढून धारावी विभाग हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ झाला होता, त्यावेळी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून प्रवीण परदेशी यांची गच्छंती होऊन इक्बालसिंह चहल यांनी नव्याने सूत्रे हाती घेतली. त्यावेळी चहल व सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी युद्धपातळीवर विविध उपाययोजना राबवून धारावीला ‘हॉटस्पॉट’मधून बाहेर काढले होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने दादर, धारावी, माहीम विभागांत आपले डोके वर काढल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या २८ फेब्रुवारी रोजीपर्यंत दादर, धारावी व माहीम या तीन विभागात मिळून कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ हजार १९७ एवढी होती. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३६३ एवढी होती.

    मात्र, १२ मार्च रोजीपर्यंत या तीन विभागातील कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार ५६९ वर गेली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या ५१४ वर गेली आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत या तीन विभागातील एकूण रुग्ण संख्येत ३७२ ने तर सक्रिय रुग्णांच्या संख्येत १५१ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या वाढलेल्या ३७२ रुग्णांमध्ये, दादरमध्ये वाढलेल्या १०८ रुग्णांचा, धारावीमधील १२४ आणि माहीममधील १४० रुग्णांचा समावेश आहे. १५१ सक्रिय रुग्णांची जी वाढ झाली आहे, त्यामध्ये दादरमधील ३२, धारावीतील – ५३ आणि माहीममधील ६६ रुग्णांचा समावेश आहे.

    सर्वाधिक रुग्ण आढलेल्या विभागात अंशतः लॉकडाऊन?

    मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांत कोरोना रूग्ण सर्वाधिक आढळत आहेत. विशेषत: अंधेरी, मुलुंड, कांदिवली, भांडूप आणि बोरिवली या पाच विभागांमध्ये रूग्णसंख्या जास्त आहे. आता कोरोनाचे दररोज दीड हजारांच्या आसपास रूग्ण आढळत असून मुंबईवर संकट गडद झाले आहे.

    पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ३ ते १० मार्च या केवळ ७ दिवसांत २४ प्रभागांमध्ये ७७४४ नवे रूग्ण आढळले, त्यापैकी केवळ ६ प्रभागांमध्ये २२७४ रूग्णांचा समावेश आहे. पालिका कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, वॉर्ड आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. हॉटेल, पब, मॉल्स येथे पाहणी वाढवली आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर नजर ठेऊन आहे. कोविड नियमांचे उल्लंघन होत असेल तर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

    हॉटेल, मॉल्स, दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे. पूर्ण क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थित बंधनकारक आहे, परंत, या नियमाचे पालन होत आहे की नाही, हा प्रश्नचिन्ह आहे. पालिकेने आणखी कठोर पाऊल उचलायला हवे. कोरोना विषाणू रूप बदलत आहे. त्यामुळे हलगर्जीपणा बाळगला नाही पािहजे. विषाणू अजून गेलेला नाही. असेच राहिले तर स्थानिक पातळीवर लॉकडाऊन घेषित करण्याची वेळ येईल असं कोविड टाक्स फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जाेशी यांनी सांगीतले.

    दिवसभरात १६४६ नवे रुग्ण

    मुंबईत शुक्रवारी १६४६ रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख ४० हजार २७७ वर पोहोचला आहे. ४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ५१९ वर पोहोचला आहे. ११२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ३ लाख १५ हजार ३७९ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या १२ हजार ४७८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी १९६ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३० चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेट झोन म्हणून घोषित केल्या आहेत. तर २१४ इमारतीत रुग्ण आढळून आल्याने त्या इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३५ लाख १६ हजार ८७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

    अशी आहे सद्यस्थिती

    बोरीवली ८१६
    अंधेरी पश्चिम ७८३
    कांदिवली ७००
    मालाड ६८८
    अंधेरी पूर्व ६८७
    मुलुंड ६११
    घाटकोपर ५७५
    भांडुप ५७१
    दादर-धारावी ५३४
    ग्रँन्टरोड ५२६