इंधन दरवाढीचा फटका : मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ ;  जाणून घ्या नवे दर

धीच पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

    मुंबई : पेट्रोल-डिजेलच्या वाढलेल्या किमतींमुळे मुंबई एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचं भाडं १८ वरुन २१ रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरुन २५ रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाडेवाढीमुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालकांना दिलासा मिळाला असला तरी सर्वसामान्यांना याची झळ सहन करावी लागणार आहे,

    गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र आज परिवहन आयुक्तांच्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. या भाडेवाढीनंतर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ठाकरे सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब या भाडेवाढीची घोषणा करणार असल्याची माहिती मिळतेय. वाढलेल्या भाड्यानुसार आता ऑटो रिक्षाचे भाडे १८ वरुन २१ रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरुन २५ रुपये होणार आहे. पण, आधीच पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.