परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ईडी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या पत्रामुळे राष्ट्रवादीचे अनुभवी आणि जेष्ठ नेते असलेले अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता पण, आणि राजीनाम्या नंतर देशमुखांची ईडी चौकशी करण्यात आली. दरम्यान आता खुद्द परबीर सिंग सुद्धा ईडीच्या रडारवर आले असून लवकरच त्यांची चौकशी होणार, असल्याची माहिती समोर आली आहे.

  मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या पत्रामुळे राष्ट्रवादीचे अनुभवी आणि जेष्ठ नेते असलेले अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता पण, आणि राजीनाम्या नंतर देशमुखांची ईडी चौकशी करण्यात आली.

  दरम्यान आता खुद्द परबीर सिंग सुद्धा ईडीच्या रडारवर आले असून लवकरच त्यांची चौकशी होणार, असल्याची माहिती समोर आली आहे. कथित वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना एकापाठोपाठ समन्स बजावण्यात आले होते, आणि अनिल देशमुख यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहे ते परमबीर सिंग सुद्धा अडचणीत सापडले आहे.

  सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी लवकर परमबीर सिंग यांना चौकशीला बोलावून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना त्याबद्दल समन्स सुद्धा बजावला आहे परमबीर सिंग यांनी ईडी समोर हजर राहण्यासाठी काही कारणास्तव अवधी मागून घेतला होता. पण, आता दुसरीकडे देशमुख यांना समन्स बजावला असून परमबीर सिंग यांना सुद्धा ईडीच्या समोर हजर राहावे लागणार आहे.

  ईडी आता सचिन वाझे यांचीही चौकशी करणार आहे. याबद्दल मुंबई PMLA न्यायालयाने ईडीला परवानगी दिली आहे. तळोजा जेलमध्ये जाऊन ईडी चौकशी करणार आहे. तर अनिल देशमुखांच्या खासगी सचिवांना ७० लाख रुपये दिले होते, असा खुलासा सचिन वाझेने जबाबात केला होता. एवढंच नाहीतर, याबद्दल अनिल देशमुख थेट आदेश द्यायचे, असंही वाझेनं आपल्या जबाबत म्हटलं होतं. वाझेच्या जबाबाने आणखी 2 महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या अडचणीत वाढ होवू शकते, त्यामुळे ईडीच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार हे हे पाहण्याचं ठरणार आहे.

  नेमकं काय आहे प्रकरण?

  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५०बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे.

  टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.