आशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय

१५ जूनपासून महाराष्ट्रात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे संपावर गेले होते. मानधन नको, वेतन द्या, या मूळ व प्रमुख मागणीसह कोरोना काळात प्रतिदिन ५०० रुपये भत्ता देण्याबरोबरच आशा स्वयंसेविका यांचा शासनाने विमा काढण्याबरोबरच आरोग्य सेवा- सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी करत राज्यातील सुमारे ७२ हजारांहून अधिक आशा व गटप्रवर्तकांनी घरात राहूनच राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला होता. परंतु आता त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून आशा स्वयंसेवकांनी त्यांचा संप मागे घेतला आहे. 

    आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची मान्यता महाराष्ट्र सरकारने दिली आहे.यावेळी आशा स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधनवाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

    आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटनांची बैठक मंगळवारी बोलावली होती. मात्र; चर्चेवेळी कोणताही तोडगा निघाला नव्हता. मात्र, काल बुधवारच्या बैठकीत तोड़गा निघाला. बुधवारी संपाचा ९ वा दिवस होता.