गणेशोत्सव काळात घनकचरा विभागात मनुष्यबळ वाढवा, भाजपाची मागणी

येत्या गणेशोत्सवात अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून  गणेशोत्सवात निर्माण होणारी कचरा समस्या दूर करावी व गणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणाचे पावित्र्य राखावे. असेही सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मुंबईकरांना अनेक समस्याना सामोरे जावे लागते.त्या त्या विभागात कर्मचारी भरून होणारी गैरसोय दूर करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

    मुंबई – ऐन गणेशोत्सवात पालिका कर्मचारी सुट्टीवर जाणे तसेच इतर कारणामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग निर्माण होतात. त्यामुळे विभागवार घाणीचे साम्राज्य पसरते. तसेच आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे या काळात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करावे. अशी मागणी करणारे पत्र भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले आहे.