कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला? महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेत तिसऱ्या लाटे जीवन अत्यावस्त केले. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३०,००० नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. सरकार सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    मुंबई :  ‘हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून कोरोना धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा काटेकोरपणे पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मुख्यमंत्र्यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.  सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनीव जनतेला आवाहन केले आहे.

    कोविड संसर्ग वाढत आहे.  येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.