भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ; सरकारविरोधी कारवायांमुळे धमक्या येऊ लागल्याने केंद्र सरकारने घेतला निर्णय

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केंद्राकडे (Central Government) सुरक्षा वाढवण्याची मागणी (Increase In Security Demand) केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची (Z category) सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कडं असेल. तीन मिनिटांत कुठल्याही प्रसांगास सामोरं जाण्यासाठी सीआयएसएफ (CISF) जवान सज्ज असतात.

    मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या BJP leader and former MP Kirit Somaiya) यांच्या सुरक्षेत  वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट मोदी सरकारने (Modi Government) सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल ४० CISF जवानांच्या सुरक्षेचं कवच असेल.

    सोमय्यांना Z दर्जाची सुरक्षा असेल. महत्त्वाचं म्हणजे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांविरुद्ध वात पेटवली आहे. त्यानंतर सोमय्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. (Security has been beefed up for BJP leader and former MP Kirit Somaiya)

    या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कडं असेल. तीन मिनिटांत कुठल्याही प्रसांगास सामोरं जाण्यासाठी सीआयएसएफ जवान सज्ज असतात. सोमय्यांच्या घराच्या बाजूलाच बॅरेक बनवून सुरक्षा रक्षकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

    भारत सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा पुरवल्या जातात. यामध्ये X, Y, Z, Z प्लस, अशाप्रकारच्या सुरक्षा कवचांचा समावेश आहे. झेड दर्जाच्या सुरक्षा कवचामध्ये २२ सैनिक असतात. यामध्ये चार किंवा पाच NSG कमांडोंचा समावेश असतो. शिवाय एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचादेखील समावेश असतो.

    काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मविआ सरकारमधील ११ नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावरुन त्यांच्या नावाची यादीच जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.