इंडियन मेडिकल असोसिएशन भिवंडी तर्फे  महानगरपालिकेस १०० आरोग्य सुरक्षा किट्स ची भेट

भिवंडी :  कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागातील वैद्यकीय कर्मचारी , कोव्हिडं १९ रुग्णालय ,व बाह्यरुग्ण विभागात काम करणाऱ्या वैद्यकीय पथकातील डॉक्टर परिचारिका यांच्या वापरा साठी इंडियन मेडिकल असोसिएशन च्या भिवंडी शाखे तर्फे नुकताच भिवंडी महानगरपालिका प्रशासनास १०० आरोग्य सुरक्षितता किट्स भेट म्हणून दिले आहेत .

सदरची भेट इंडियन मेडिकल असोसिएशन च्या भिवंडी शाखाध्यक्ष डॉ .उज्वला बद्रापुरकर ,डॉ संजीवकुमार रत्नापुरकर यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या कडे सुपूर्द केली .या प्रसंगी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोव्हिडं १९ रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकाहक डॉ अनिल थोरात, महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे आदी मान्यवर उपस्थित होते .
  इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वतीने देण्यात आलेल्या किट्स बद्दल प्रशंसौदगार काढीत  करोना विषाणू विरोधातील या लढाईत शासन प्रशासन काम करीत असताना समाजातील स्वयंसेवी संस्था ,दानशूर व्यक्ती यांनी सुद्धा पुढे येऊन या कार्यात हातभार लावावा असे आवाहन आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी केले.