गेल्या आठवड्यातील पडझडीनंतर शेअर बाजारात तेजी परत, सलग दुसऱ्या दिवशी हिरवा बावटा

संभाव्य लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीच्या भीतीने अनेकांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्यामुळे शेअर बाजार कोसळत असल्याचं चित्र गेल्या आठवड्यात दिसत होतं. लॉकडाऊनबाबत अनिश्चितता असल्यामुळे अनेक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात विक्री होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा खरेदीला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. 

    देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आणि संभाव्य लॉकडाऊनची भीती यामुळे गेल्या आठवड्यात कोसळलेल्या शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून काहीशी खरेदी होताना दिसत आहे. सोमवार आणि मंगळवारी बाजार हिरव्या रंगात बंद झाला असून आजदेखील (बुधवारी) भारतीय शेअर बाजारांमध्ये खरेदीदारांचा उत्साह दिसत आहे.

    संभाव्य लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीच्या भीतीने अनेकांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्यामुळे शेअर बाजार कोसळत असल्याचं चित्र गेल्या आठवड्यात दिसत होतं. लॉकडाऊनबाबत अनिश्चितता असल्यामुळे अनेक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात विक्री होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा खरेदीला सुरुवात झाल्याचं चित्र आहे.

    आज (बुधवार) बाजार उघडताच मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याचं चित्र दिसलं. भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सुमारे १०० अंशांची, तर सेन्सेक्समध्ये ४०० अंशांनी वाढ नोंदवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आपटी खाणाऱ्या बँका आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचं चित्र दिसलं. त्याचप्रमाणं फायनान्स क्षेत्रातले समभागही चांगलेच वधारल्याचं दिसलं.

    दरम्यान, सामान्य गुंतवणुकदारांनी छोट्या छोट्या प्रमाणात खरेदी करत राहावी आणि प्रत्येकवेळी बाजार पडल्यानंतर खरेदीची संधी सोडू नये, असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत.