मला जेव्हा वाटेल की आता यात राम नाही तेव्हा बघू..; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे (Pritam munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे (Pritam munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत.

  या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. यावेळी पंकजा यांना बोलताना माईकच्या तांत्रिक बिघाडाला बराचवेळ सामोरे जावे लागले. दिल्लीतील भेटीत पक्ष संघटनेवर चर्चा झाल्याचे पंकजा यांनी सांगितले.

  आपण बांधलेले घर का सोडायचे, असा सवाल पंकजा यांनी केला. मला जेव्हा वाटेल की आता यात राम नाही तेव्हा बघू, माझे नेते मोदी, शहा, नड्डा आहेत. केंद्रीय, राज्यात मंत्री नसले म्हणून काय झाले, मी राष्ट्रीय मंत्री आहे, अशा शब्दांत पंकजा यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत घातली.

  माझा परिवार केवळ प्रितम मुंडे आहे का? माझा परिवार मुंडे साहेबांना प्रेम करणारा काना-कोप-यातील कार्यकर्ता आहे, मुंडे साहेबांचे स्वप्न वंचिताना सत्तापदावर बसवण्याचे होते ते पूर्ण करण्यासाठी आमचा संघर्ष आहे. त्यामुळे हे आपले घर सोडून जाण्याची वेळ नाही. मला माहिती आहे हा प्रवास खडतर आहे मी हरले पण संपले नाही कारण माझी शक्ति तुम्ही आहात. ती अशी वाया जावू देवू नका अशी साद घालत भाजप नेत्या पंकजा मुंडे यानी सुमारे पाऊण तासांच्या छोटेखानी भाषणात मनातील खद खद देखील व्यक्त केली. मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी राजीनामे देवून आलेल्या समर्थकांना त्यानी भारतीय जनता पक्षातच राहण्याचे आवाहन केले.

  वरळीत समर्थकांची गर्दी

  खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे समर्थकांनी राजीनामे देण्याचे सत्र सुरू केले होते. या नाराज समर्थकांपैकी काही जणानी वरळी येथील निवास स्थाना बाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली.  अमर रहे गोपीनाथ मुंडे  अमर रहे, पंकजाताई आगे बढो, राज्य का नेता कैसा हो पंकजा ताई जैसा हो अश्या घोषणा या वेळी देण्यात येत होत्या.

  या साधारण पाचशे सहाशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा राग शांत करताना केलेल्या छोटेखानी आवाहनपर भाषणात पंकजा मुंडे यानी राज्यातील भाजप मधील देवेंद्र फडणवीस वगळता अन्य ब-याच नेत्यांची नावे घेवून त्यांच्या बद्दल मत व्यक्त केले. मात्र त्यावेळी त्यांच्या मनातील खदखद त्यानी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी राजीनामे देवून शक्ती वाया घालविण्याची ही वेळ नाही जेंव्हा घराचे छतच अंगावर कोसळेल असे वाटेल तेंव्हा विचार करू असे सांगत राजीनामे फेटाळत असल्याची घोषणा केली.

  नाराज नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम

  पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी नाराज समर्थकांची वरळी येथील निवासस्थानी बैठक झाली, त्यावेळी राजीनामे देण्याची ही वेळ नाही. मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली ही शक्ती अशीच कायम राहू द्या असे आवाहन पंकजा यानी केले. मोदी सरकारच्या विस्तारात  खासदार प्रीतम मुंडे यांना संधी डावलून  डॉ भागवत कराड आणि भारती पवार यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. त्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये मुंडे भगिनींना जाणिवपूर्वक वगळून त्यांच्या राजकारणाला शह देण्यासाठीच डॉ कराड यांना मंत्रिमंडळात प्रवेश देण्यात आल्याची चर्चा होत राहिली त्यातच मुंडे भगिनींनी राज्यातील कुणाही मंत्र्याना शुभेच्छा दिल्या नाहीत या गोष्टीची भर पडली. त्यामुळे पंकजा यांनी दुसऱ्या दिवशी नाराज नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता.

  सुमारे ९० पदाधिकारी कार्यकर्त्याचे राजीनामे

  त्यानंतरही त्यांच्या समर्थकांचे राजीनामासत्र सुरूच होते. मागील तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद सदस्य, ३५ पंचायत समिती सदस्य, ४० नगरसेवक, १६ बाजार समिती सदस्य, बीड जिल्ह्यातील भाजपचे ११ मंडळ अध्यक्ष या शिवाय शिरूर पंचायत समिती उपसभापतींसह केज, पाटोदा आणि गेवराई येथील पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द केले. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी वरळी येथील निवासस्थान कार्यालयात नाराज समर्थकांना आवाहन केले. मुंबईत घोषणा देत पंकजा समर्थकांनी वरळीतील कार्यालयासमोर गर्दी केली होती.

  दबावतंत्रही करायचे नाही

  हा माझा निर्णय आहे तो तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे,असे म्हणत त्यानी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामेही फेटाळून लावल्याचे सांगत आपले कार्यकर्ते फक्त आपलेच आदेश ऐकतील हे दाखवून दिले आहे. पंकजा मुंडे यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर केले. त्या म्हणाल्या की, तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे. मला दबावतंत्रही करायचे नाही. माझा तो स्वभाव नाही. माझ्यावर ते संस्कारही झाले नाहीत.

  माझा निर्णय तुम्ही मान्य कराल

  गोपीनाथ मुंडे यांनी ऊसाच्या फडातून आणून माणसे जोडली. कुणाला सभापती बनवलं तर कुणाला मार्केट समितीचा चेअरमन केले. हे असेच जाऊ द्यायचे का सगळे?, असा सवाल करतानाच इथून पुढे असा प्रयोग करू नका. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. पद मिळवणे हे मुख्य ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणे आहे. मला जेव्हा वाटेल इथे राम नाही. तेव्हा बघू. पण आता आपण आपले घर सोडायचे नाही. हा माझा निर्णय तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असे आवाहन त्यानी केले.

  शक्ती कमी करण्याचा डाव

  त्या म्हणाल्या की, मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे. मला अमूक पद हवं, तमूक पद हवं असे मी कधीच म्हटले नाही. कधीच तशी मागणी केली नाही. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसवणे हे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच माझा संघर्ष सुरू होता. त्यासाठीच त्यांच्या निधनानंतर मी संघर्ष यात्रा काढली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, आपली शक्ती कमी करण्याचा डाव पूर्ण होऊ द्यायचा नाही.

  खडतर मार्ग पण संघर्ष करत राहू

  मला पुढे खडतर मार्ग दिसतो. पण आपण संघर्ष करत राहू, असे सांगत त्या म्हणाल्या की, योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत. सात्विक आहोत, धर्मयुद्धात पाच पांडव जिंकले. त्यांनी फक्त सात गावे मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचे कौरव म्हणाले. त्यानंतरही पांडव जिंकले. या धर्मयुद्धात पांडव का जिंकले? कारण त्यांच्याकडे कृष्णाचे सारथ्य होते. त्यांच्याविरोधात जे लढत होते, त्यांच्या मनातही पांडवांच्या मनात प्रेम होते. म्हणून पांडव जिंकले.

  हा धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न

  काळ कधीच कुणासाठी थांबत नाही. मी दु:खी नाही. मला काही मिळाले नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असे पंकजा म्हणाल्या.

  फटकार खावून आली असे वाटते का?

  त्या म्हणाल्या की, काल मी दिल्लीत गेले होते. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल हे त्यांनी सांगितले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकार खावून तुमच्यापुढे आली असेल असे वाटते का?, असा सवालही त्यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मला केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तेव्हा मी मंत्रिपद नाकारले होते. आता मी पद मागेल का?, असा सवालही त्यांनी केला.

  तुम्हाला या बातमी बाबत काय वाटते? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…