इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ

इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आज शुक्रवारी होणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray)  यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे.

मुंबई : इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आज शुक्रवारी होणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray)  यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. यावेळी अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. मात्र या समारंभावरून अनेक मंत्री नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे.

या कार्यक्रमाला फक्त १६ जण आमंत्रित आहेत. कोरोनामुळे छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. अनेकांना या कार्यक्रमाची माहितीसुद्धा नव्हती. जे मंत्री उपस्थित असणार आहेत. त्यांना ही अगदी कमी कालावधीत या कार्यक्रमाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

या मंत्र्यांची असणार उपस्थिती :

पायाभरणीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उदधव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, मुख्य सचिव, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, स्थानिक आमदार सदा सरवणकर, दोन स्थानिक नगरसेविका आणि महापौर यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण मिळालेलं नाही असं सांगण्यात येत आहे.