Coronavirus patients get fungal infections, eyes, nose and jaw fail

कोरोनाचे रुग्ण वाढ वाढली असताना अशा रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने इंडस्ट्रियल ऑक्सिजन उत्पादकांना ऑक्सिजन निर्मित करण्याचे सांगण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीत करण्यात आली. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीत गुणवत्ता राहिली नसावी. त्यामुळे ऑक्सिजनची लॅब टेस्ट करावी अशी मागणी ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.

    मुंबई : काळ्या बुरशीचे (ब्लॅक फंगस) रुग्ण वाढत आहेत. सुमारे पाच राज्यात या आजाराचे रुग्ण आढळून आले असून त्यात महाराष्ट्रातील रुग्णांची वाढ होत आहे . आरोग्य मंत्री यांनी आधीच स्पष्ट केले कि हे इंजेक्शन ३१ मे नांतर मिळू शकते. तोपर्यंत केंद्राकडे मागणी केली आहे. मात्र अँपिटॉरेंसीन बी च्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चा मालच नसल्याने या इंजेक्शनचा राज्यात वानवा आहे.

    दरम्यान, गंभीर रुग्णांना पुरविण्यात आलेल्या ऑक्सिजन दर्जाहीन असल्याने काळ्या बुरशीचा आजार पसरला असल्याचा आरोप होत आहे. ऑक्सिजन गुणवत्तेची तपासणी व्हावी अशी मागणी देखील होत आहे.

    खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांकडे मागणी केली जात आहे. नातेवाईक देखील इंजेक्शनच्या शोधात फिरत आहेत. मात्र बाजारात इंजेक्शन नसल्याने कित्येक रुग्ण गर्भगळीत झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरा पूर्वी पर्यंत हे इंजेक्शन ऑनलाईन देखील विकले जात होते असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. यावर इंजेक्शनची किंमत ३ हजाराच्या दरात असल्याचा स्क्रिनशॉट हि दाखवला जात आहे. मात्र सध्या प्रत्यक्षात इंजेक्शनच्या शोधासाठी निघालेल्या नातेवाईकांना दुप्पट किंमत सांगितली जात आहे. असा अनुभव एक रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितला. इंजेक्शन न मिळाल्याने आता ३१ मे पर्यंत वाट पाहण्या शिवाय रुग्णाना गत्यंतर राहिले नाही.

    काळ्या बुरशी रोगाचे कारण दूषित ऑक्सिजन पुरवठा ?

    दरम्यान काळ्या बुरशीचा आजार साथरोग नियमावलीत घेण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढ वाढली असताना अशा रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने इंडस्ट्रियल ऑक्सिजन उत्पादकांना ऑक्सिजन निर्मित करण्याचे सांगण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीत करण्यात आली. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीत गुणवत्ता राहिली नसावी. त्यामुळे ऑक्सिजनची लॅब टेस्ट करावी अशी मागणी ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.