पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ; मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर ९०.३४ रुपये  

मुंबई : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. सोमवारी सलग सहाव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली आहे. सोमवारी पेट्रोल २०  पैशांनी तर, डिझेल २६  पैशांनी महागले आहे.

डिझेल दरवाढीने मालवाहतूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे.

तर, चेन्नईत देखील पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.

तब्बल १५ वेळा झालेल्या दरवाढीने डिझेल ३.४१ रुपयांनी महागले आहे. २० नोव्हेंबरपूर्वी कंपन्यांनी ४८ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर दरवाढीचा सपाटा कायम ठेवला. २० नोव्हेंबरनंतर झालेल्या १५ वेळा दरवाढीने पेट्रोल देखील २.५५ रुपयांनी महागले आहे.