Inflation hits Mumbaikars Prices of vegetables went up by Rs 30

पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस आणि सीएनजीच्या वाढत्या दरामुळे फळ-भाज्यांचे भावही गगणाला भिडले आहेत(Inflation hits Mumbaikars). घाऊक बाजारात फळभाज्या १० ते १५ रुपये महागल्या असून किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपयांनी दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलने शंभरी कधीच गाठली होती. तर आता डिझेलनेही शंभरी गाठली आहे. पेट्रोलचे मुंबईत सध्या ११२ प्रति लिटर असे दर आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे मालवाहतुकीचेही दर वाढले असून त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे(Prices of vegetables went up by Rs 30).

    मुंबई : पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस आणि सीएनजीच्या वाढत्या दरामुळे फळ-भाज्यांचे भावही गगणाला भिडले आहेत(Inflation hits Mumbaikars). घाऊक बाजारात फळभाज्या १० ते १५ रुपये महागल्या असून किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपयांनी दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलने शंभरी कधीच गाठली होती. तर आता डिझेलनेही शंभरी गाठली आहे. पेट्रोलचे मुंबईत सध्या ११२ प्रति लिटर असे दर आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे मालवाहतुकीचेही दर वाढले असून त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे(Prices of vegetables went up by Rs 30).

    कोरोना काळात खाद्यपदार्थांचे भाव कधी वाढले, हे कोणालाही समजले नाही. खाद्यपदार्थांचे भाव तर वाढलेच, उलटपक्षी पगार मात्र कमी झाले. काहींना ५० टक्क्यांवर काम करावे लागले तरी काहींची नोकरीच गेली, त्यामुळे उत्पन्न शून्य; अशी परिस्थिती निर्माण झाली. कोरोनाच्या दीड वर्षानंतर सर्वसामान्य होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या मुंबईकरांचा अपेक्षाभंग झाला आहे. तेल, डाळींच्या किंमतीमध्ये अचानक वृद्धी झाल्यामुळे सर्वसामान्य गृहणींचे बजेट कोलमडले आहे.

    ‘महाराष्ट्र बंद’चा परिणाम

    मुंबईच्या ऑल इंडिया व्हेजिटेबल असोसिएशनने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यासत आली होती. त्यामुळे भाजीपाल्याची आयात कमी झाली. त्याचाही परिणाम झाला आहे. पेट्रोल­-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अवकाळी, परतीच्या पावसामुळेही उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांचा चांगला भाव मिळत नाही. पावसामुळे जोपर्यंत भाज्यांचे नवीन उत्पादन येत नाही, तोपर्यंत हे भाव असेच कायम राहतील, अशी शक्यता असोसिएशनने वर्तवली आहे.