udhav thackrey

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई मंगळवारपासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.

मुंबई : महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव केला आहे. परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड फ्लू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई मंगळवारपासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड फ्लू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकी नंतर उपययोजनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक भांगामध्ये कोंबड्या, कावळे आणि इतर पक्षांचा मृत्यू झाल्याने राज्याची चिंता वाढली आहे. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. त्यानंतर आता महाराष्ट्रातही धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे.