रेल्वे स्थानकांवर विनास्पर्श प्रवेशासाठी इन्फ्रारेड कॅमेरा आधारित तापमान देखरेख प्रणाली

मुंबई:भारतीय रेल्वेने देशातील महत्त्वाच्या मार्गांवर प्रवासी रेल्वे सेवा अंशतः पुन्हा सुरू केल्या आहेत आणि कोविड-१९ संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. कोविड-१९ ची

मुंबई: भारतीय रेल्वेने देशातील महत्त्वाच्या मार्गांवर प्रवासी रेल्वे सेवा अंशतः पुन्हा सुरू केल्या आहेत आणि कोविड-१९ संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे.  कोविड-१९ ची लक्षणे असलेल्या प्रवाशांना प्रभावीपणे स्कॅन करण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस  येथे स्क्रीनिंग सुविधा (फेब्री आय ) स्थापित केली आहे. ही प्रणाली कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून रेल्वे प्रवाशांसाठी विनास्पर्श प्रवेश प्रणाली उभारण्यात आली आहे.  स्वयंचलित तिकीट तपासणी व व्यवस्थापन मशीन  आणि अर्जुन प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा आणखी एक प्रयत्न आहे. फेब्रीआय या मानवी शरीर तपासणी सुविधेसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मध्य रेल्वेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक  व अभिनंदन केले.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, फेब्रीआय थर्मल कॅमेरे मोठ्या क्षेत्राला कव्हर करू शकतात म्हणजेच  अनेक लोकांचे तापमान प्रवेशाच्या एकाच ठिकाणी होऊ शकते आणि प्रवासी चालत असतानाच तापमान आपोआप रेकॉर्ड करू शकते. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस  येथे मेल/एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी गाडीत चढण्यासाठी फलाटावर  जाण्यापूर्वी प्रवेश द्वारात फेब्रीआय द्वारा  स्कॅन केले जात आहेत. या दोन मोठ्या स्थानकांवर ड्युटीवर येणाऱ्या सर्व रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सुद्धा  या कॅमेर्‍याच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल म्हणाले की, प्रवाशांची  आवश्यक सुरक्षा तपासणी सुनिश्चित करतानाच,   विनाव्यत्ययाने प्रवास करण्यास मदत करण्यासाठी अत्याधुनिक उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करण्यास  भारतीय रेल्वे  वचनबद्ध असून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचा हा उपक्रम म्हणजे या दिशेने पडलेले एक पुढचे पाऊल आहे.
 
स्थानकांत प्रवेश केलेल्या व्यक्तीला जास्त ताप नाही याची खात्री करण्यासाठी  वास्तविक वेळ, स्वयंचलित आणि  अनाहूत देखरेखीसाठी  आधारित फेब्रीआय ही थर्मल स्क्रीनिंग सिस्टम आहे.  फेब्रीआय ‘ब्लॅक बॉडी’ सह सज्ज आहे, जे एक तापमान सतत स्तोत्र ०.३ डिग्री सेल्सियस पर्यंत कमी-अधिक  (+/-)  अचूकता सुनिश्चित करते .
 
वैशिष्ट्ये – कपाळाचे तापमान मोजते,  सोशल डीस्टन्सिंगसाठी महत्त्वपूर्ण, विनास्पर्श शोध,  ड्युएल (थर्मल  + दृष्टी) कॅमेरा, ब्लॅक बॉडीसह ०.३ अचूकता, सोयीस्कर , उच्च क्षमता , प्रत्यक्ष वेळेत इशारा 
 
फेब्रीआय उष्णतेचे सेन्सर वापरते जे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील किंवा एखाद्या वस्तूतील  उत्पन्न उष्णता रेकॉर्ड करू शकते. तसेच तापमानाच्या भिन्न पातळीसह २ डी प्रतिमा तयार करते.  जेव्हा प्रवाशी  कॅमे-यांसमोरून जातील तेव्हा ज्या व्यक्तीला  सेट केलेल्या श्रेणीपेक्षा जास्त  तापमान असेल तर   कॅमेर्‍याशी जोडलेल्या संगणकाच्या स्क्रीनवर उर्वरित रंगाच्या पॅटर्नमध्ये भिन्न रंग दर्शविले जाते. मानवी शरीर तपासणी करिता  मध्य रेल्वेने सुरू केलेली फेब्रीआय ही सुविधा रेल्वेने सुरू केलेल्या आधुनिक सुरक्षा उपायांच्या दृष्टीने  टाकलेले  आणखी एक पाऊल असल्याचे म्हटले आहे.