आयएनएस करंज नौदलात दाखल, भारताची ताकद वाढली

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण घटना म्हणून आयएनएस करंजकडं पाहिलं जातंय. स्कॉर्पिअन वर्गातील पाणबुडी आयएनएस करंज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालीय. मुंबईत समारंभपूर्वक या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आलं. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या ताकदीत कित्येक पटींनी वाढ होणार आहे. शत्रूला थांगपत्ताही लागू न देता शत्रूच्या प्रांतात घुसून विनाश करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. 

    जमीन, हवा आणि समुद्र अशा तिन्ही ठिकाणची ताकद आणि सुरक्षा हेच देशाच्या संपूर्ण सुरक्षेचं सू्त्र मानलं जातं. भारताची सुरक्षा या तिन्ही पातळ्यांवर मजबूत असल्यानेच आशिया खंडातील एक शक्तीशाली देश म्हणून भारताकडं पाहिलं जातं. भारताच्या नौदलात आता आणखी एका नव्या पाणबुडीचं आगमन झाल्यामुळे भारताची ताकद आणखी वाढलीय.

    देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण घटना म्हणून आयएनएस करंजकडं पाहिलं जातंय. स्कॉर्पिअन वर्गातील पाणबुडी आयएनएस करंज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालीय. मुंबईत समारंभपूर्वक या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आलं. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या ताकदीत कित्येक पटींनी वाढ होणार आहे. शत्रूला थांगपत्ताही लागू न देता शत्रूच्या प्रांतात घुसून विनाश करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.

    पाणबुडीची वैशिष्ट्ये

    यापूर्वीदेखील स्कॉर्पिअन वर्गातील दोन पाणबुड्या भारतीय नौदलात कार्यरत आहेत. आयएनएस कलवरी आणि आयएनएस खंडेरी नौसेनेच्या ताफ्यात आहेत. यानंतरही दोन पाणबुड्या भारतीय नौदलात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत.