Rane father-son blow to Shiv Sena; Unopposed election of 28 members in Sindhudurg

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते सोमय्यांवर टीका केली आहे. सोमय्या यांनी केवळ नार्वेकरांच्या बंगल्यांची पाहणी करू नये. तर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या  जुहूमधील बंगल्यांचीही पाहणी करावी, असे आव्हान वैभव नाईक यांनी सोमय्यांना दिले आहे. मुख्यमंत्र्याचे स्विय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील निर्माणाधीन बंगल्यावर त्यांनी स्वत:च कारवाई केली आहे मात्र भाजप नेते किरीट सोमय्या उद्या या कारवाईची पाहणी करण्यासाठी दापोलीला जाणार आहेत.

    मुंबई : शिवसेना आमदार वैभव नाईक(MLA Vaibhav Naik) यांनी भाजप नेते सोमय्यांवर टीका केली आहे. सोमय्या यांनी केवळ नार्वेकरांच्या बंगल्यांची पाहणी करू नये. तर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्या  जुहूमधील बंगल्यांचीही पाहणी करावी, असे आव्हान वैभव नाईक यांनी सोमय्यांना दिले आहे. मुख्यमंत्र्याचे स्विय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील निर्माणाधीन बंगल्यावर त्यांनी स्वत:च कारवाई केली आहे मात्र भाजप नेते किरीट सोमय्या उद्या या कारवाईची पाहणी करण्यासाठी दापोलीला जाणार आहेत.

    जुहूमध्ये ‘अधीश’ बंगला आणि सिंधुदुर्गात अनधिकृत बांधकाम

    वैभव नाईक यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले की, मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचे पडलेले बांधकाम पाहायला येण्याआधी नारायण राणे यांचा जुहूमधील ‘अधीश’ बंगला आणि सिंधुदुर्गात केलेल्या अनधिकृत बांधकामाचीही पाहाणी सोमैय्या यानी करावी,

    नार्वेकर यांनी स्वत: बांधकाम पाडले

    मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी नार्वेकर यानी बंगला बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र किनारा नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून हा बंगला बांधण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आल्याने हा बंगला पाडण्याचे काम सकाळपासूनच जेसीबी मशीन लावून नार्वेकर यांनी स्वत: सुरू केले आहे. किरीट सोमय्या यांनी या तोडकामाची चित्रफित व्टिट करून माहिती दिली. तसेच हा बंगला किती तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जात आहेत. त्यावेळी त्यानी आज नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचे व्टिट केले आहे.