पवारसाहेबांवर टीका करण्याऐवजी तुम्ही कृषीमंत्री असताना काय दिवे लावले; राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासेंचा  अनिल बोंडेना सवाल.

मुंबई :भाजपाच्या सत्तेत कृषीमंत्री होतात मग शेतकर्‍यांना काय दिलात याचे आत्मपरीक्षण करावे आणि नंतर लोकनेत्यावर बोलण्याचे धाडस करावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी अनिल बोंडे यांना सल्ला दिला आहे. शरद पवारसाहेबांवर टीका करण्याऐवजी तुम्ही कृषीमंत्री असताना काय दिवे लावले ते आधी पहावे तुम्हाला पवार साहेब समजायला सात जन्म घ्यावे लागतील असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी अनिल बोंडे यांचा दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करणार्‍या माजी मंत्री अनिल बोंडे यांचा महेश तपासे यांनी आज समाचार घेतला. पवारसाहेब देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी एका झटक्यात केली होती. तुम्ही मात्र तत्वत: आणि नियम अटी टाकून शेतकर्‍यांना झुंजवत राहिलात असा आरोप महेश तपासे यांनी केला. अनिल बोंडे तुमच्या प्रदेशाध्यक्षांना शरद पवारसाहेबांवर पीएचडी करायला जमले नाही तर तुम्हाला पवार साहेब समजायला सात जन्म घ्यावे लागतील असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.