कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. गर्दी टाळावी, सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन करावे. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. अशा सूचना पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

    मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे अरोग्य यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. पुरेसा औषधसाठा, आवश्‍यक त्या सोयींनी युक्त रुग्णवाहिका, ऑक्‍सिजन युक्त बेड आदी आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना गतीने करा, अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ. डी. बी. कदम यांनी कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना आणि लसीकरणाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गृह विलगिकरण, ऑक्‍सिजन युक्त बेडवरील रुग्ण, उपलब्ध बेड यांसह ग्रामीण भागातील कोविड-19 सद्यस्थितीची माहिती देऊन उपाययोजनांची माहिती दिली.

    अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

    सीओईपी जम्बो कोविड सेंटर येथील बेडची संख्या आवश्‍यकतेनुसार 800 पर्यंत वाढवून हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करा

    पिंपरी-चिंचवड मधील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करा.

    हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांसाठी 50 टक्के राखीव बेड ठेवण्याची कार्यवाही करा.

    लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. गर्दी टाळावी, सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन करावे. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. अशा सूचना पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यांन पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागांतील करोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. ग्रामीण भागात आवश्‍यक वैद्यकीय सुविधा, सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका, पुरेसे बेड उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे. असंही पवारानी अधिकाऱ्यांना सांगितलं.