अतिवृष्टी झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना : अजित पवार

मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्या - त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोचले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

    मुंबई : मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्या – त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोचले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

    मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या – त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.