Insults to teachers in Bisleri company's advertisement; Outraged teachers demand apology

‘समझदार भी पीते है’ या शीर्षकाखाली बिसलेरी कंपनीने बनवलेल्या नव्या जाहिरातीवरून सध्या वादंग निर्माण झाला आहे. या जाहिरामध्ये भरवलेल्या उंटांच्या शाळेमध्ये उंटाकडून शिक्षकांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील शिक्षकांकडून याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने यासंदर्भात जाहिरात प्राधिकरणाकडे बिसलेरीविरोधात तक्रार केली आहे.

    मुंबई : ‘समझदार भी पीते है’ या शीर्षकाखाली बिसलेरी कंपनीने बनवलेल्या नव्या जाहिरातीवरून सध्या वादंग निर्माण झाला आहे. या जाहिरामध्ये भरवलेल्या उंटांच्या शाळेमध्ये उंटाकडून शिक्षकांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील शिक्षकांकडून याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने यासंदर्भात जाहिरात प्राधिकरणाकडे बिसलेरीविरोधात तक्रार केली आहे.

    बिसलेरी कंपनीची ‘समझदार भी पिते है’ या शीर्षकाखाली येणार्‍या विविध जाहिरातींना नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. मात्र नुकतीच बिसलेरीने याच शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या नव्या जाहिरातीने खळबळ माजवली आहे. बिसलेरीच्या नव्या जाहिरातीमध्ये उंटांची शाळा भरवण्यात आली असून, यामध्ये एक शिक्षक उंटांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉन्टॅक्ट लेस (स्पर्शरहित) यासंदर्भात माहिती देत असतो. त्याचवेळी शिक्षक मटक्यातील पाणी ग्लासाने घेत असतो. त्याचदरम्यान उंट हे शिक्षकाची खिल्ली उडवून त्यांना कॉन्टॅक्ट लेस म्हणजे बिसलेरी असे सांगतात.

    मात्र, त्यानंतर कंपनीने त्यांची पंच लाईन ‘समझदार भी पिते है’ ही दिली आहे. यातून शिक्षकांची खिल्ली उडवत अपमान करण्यात आला आहे. बिसलेरीने त्यांच्या जाहिरातीमधून शिक्षकांचा आत्मसन्मान पायदळी तुडवला आहे. यामुळे देशातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जाहिरातीमध्ये शिक्षकांचा अपमान करण्यात आल्याने ही जाहिरात तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे.

    बिसलेरीने जाहिरात आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यासंदर्भात बिसलेरी तसेच केंद्र सरकारच्या जाहिरात प्राधिकरणाला ही जाहिरात तातडीने मागे घेण्यासंदर्भात निवेदन दिलेआहे. बिसलेरी कंपनीने तात्काळ ही जाहिरात मागे घेऊन शिक्षकांची माफी मागावी अन्यथा देशभरातील शिक्षक बिसलेरी कंपनी विरोधात आंदोलन करतील असा इशारा अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने दिल्याचे संघटनेचे महा सचिव वैभव नरवडे यांनी सांगितले.