विधान परिषदेच्या इच्छुक उमेदवारांनी ५ ऑक्टोबर पर्यंत आपले अर्ज टिळक भवन येथे पाठवावेत.

मुंबई : विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त जागांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी ५ ऑक्टोबरपर्यंत आपले उमेदवारी अर्ज  प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे ईमेलद्वारे पाठवावेत असे आवाहन प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

विधानपरिषदेच्या आगामी काळात रिक्त होणा-या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. अर्जाचा नमुना टिळक भवन येथे उपलब्ध आहे.  तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत office@mahacongress.com, nchavanpcc@gmail.com  या ईमेलवर पाठवावेत. यासंदर्भात काही अडचण आल्यास कार्यालय अधिक्षक नामदेव चव्हाण मो. क्र. 9820126629 यांच्याशी संपर्क साधावा असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.