निर्मला निकेतनमध्ये दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय शांतता परिषद

 'समुदाय आधारित शांततेसाठी उपक्रम, आव्हाने आणि संधी' हा परिषदेचा विषय असणार आहे. समुदाय आधारित उपक्रमांच्या दृष्टीकोनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यामधील मुख्य समस्या, आव्हाने व विविध विचार प्रणालीचा शोध घेणे यावर चर्चा केली जाणार आहे.

मुंबई —  चर्चगेट येथील कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन येथे येत्या १८ व १९ डिसेंबर रोजी  ऑनलाईन आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेचे  आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत होणा-य़ा या परिषदेत विविध आंतराष्ट्रीय नामांकित वक्त्यांची भाषणे होतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.

‘समुदाय आधारित शांततेसाठी उपक्रम, आव्हाने आणि संधी’ हा परिषदेचा विषय असणार आहे. समुदाय आधारित उपक्रमांच्या दृष्टीकोनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यामधील मुख्य समस्या, आव्हाने व विविध विचार प्रणालीचा शोध घेणे यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच शांततेचे महत्व समजून घेणे, रणनितीचा शोध घेण्यासाठी व्यासपीठ तयार करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर असुरक्षित समुदायांसाठी सामोरे जाण्यासाठी मुख्य समस्या आणि आव्हानांचे विश्लेषण करणे, समुदाय आधारित शांतता निर्माण करण्याचा मार्ग समजून घेणे हा परिषद घेण्याबाबतचा उद्देश आहे.

सदर परिषदेत प्राध्यापक क्रिस्तोफ जेफ्रेलोट (लंडन) , फ्रेंच पॉलिटिकल सायंटिस्ट, डॉ. पी. के. शजहान आदी नामांकित वक्त्यांची भाषणे होणार आहेत. विविध विषयावर शोध निबंधही सादर केले जाणार आहेत.