मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा; खेळाडूंना वाव देण्यासाठी विद्यापीठाने कसली कंबर

मरीन ड्राईव्ह क्रीडा संकुलाची दूरवस्था झाल्याने नुतनीकरणाची मागणी मागील काही महनि्यांपासून वारंवार करण्यात येत असते. त्यामुळे या संकुलाचा कायापालट करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला असल्याची माहिती अधिसभेत दिली.

  मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या मरीन ड्राईव्ह येथील क्रीडा संकुलाची दुरवस्था असल्याने विद्यार्थ्यांचा त्याचा वापर करता येत नाही. त्यांना सरावाला संकुल उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण निर्माण हाेत आहे. मात्र आता विद्यार्थ्यांची ही गैरसोय लवकरच दूर होणार आहे. मरनि ड्राईव्ह येथील क्रीडा संकुल द्ययावत करण्याबरोबरच त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

  आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम, बास्केटबॉल स्टेडियम, ऑलिम्पिक दर्जाचा धावण्याच ट्रॅक या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३६.२५ कोटींचा प्रस्ताव विद्यापीठ तयार करत आहे.

  मरीन ड्राईव्ह क्रीडा संकुलाची दूरवस्था झाल्याने नुतनीकरणाची मागणी मागील काही महनि्यांपासून वारंवार करण्यात येत असते. त्यामुळे या संकुलाचा कायापालट करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला असल्याची माहिती अधिसभेत दिली. त्यावर अधिसभा सदस्य नील हेळेकर यांनी संकुलाचा विकास म्हणजे नेमके काय करण्यात येणार आहे, असा प्रश्न विचारला असता, प्र-कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी संकुलाचे नुतनीकरण करून ते आंतराष्ट्रीय दर्जाचे बनवण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले.

  संकुलाबद्दल माहिती

  संंकुलाचा सुमारे साडे सात एकरचा परिसर आहे. यामध्ये सध्या स्पोर्ट्स पॅव्हेलियन इमारत, ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, दोन बॅडमिंटन कोर्ट, चार ते पाच हजार क्षमतेचे स्टेडियम या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत करण्यात येणार असून यासाठी टाटा संस्थेने पुढाकार घेतला आहे. यामुळे विद्यापीठाने ३६.२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव संस्थेला पाठविला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतील असा ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचा ट्रॅक, फुटबॉल, बास्केटबॉल स्टेडियम उभारण्यात येणार आहे. तसेच १० हजार लोक बसू शकतील असे स्टेडियमही बांधण्यात येणार आहे.

  बॅटमिंटन कोर्टसह लांब उडी, उंच उडी, अशा विविध क्रीडा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सर्व सुविधा अद्ययावत व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उभारण्यात येणार असल्याचे प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले. याशिवाय बॉक्सिंग, रेसलिंग, ज्युडो, हॅण्डबॉलची सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यापीठ तसेच विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांतील विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ प्राधान्यांने देण्यात येईल असेही प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले.