संवैधानिक व्यवस्थेविरोधातील कृत्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करा : नाना पटोले यांची मागणी

फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील (Karnataka and Madhya Pradesh) सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने (The central government) गैरवापर करत अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील (against the constitutional order) हे कृत्य असल्याने संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा.

  मुंबई (Mumbai). फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील (Karnataka and Madhya Pradesh) सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने (The central government) गैरवापर करत अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील (against the constitutional order) हे कृत्य असल्याने संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

  पॅगेसास प्रकरणी प्रदेश कॉंग्रेस राजभवनाबाहेर धरणे आंदोलन करणार असून राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. या प्रकरणी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून दोषींविरोधात कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी दिली.

  केंद्र सरकारने यंत्रणेचा गैरवापर केला
  माध्यमांसमोर बोलताना पटोले म्हणाले की, फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने यंत्रणेचा गैरवापर केला. अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील हे कृत्य आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

  ते म्हणाले की, विधानसभेत मी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. माझेही फोन टॅप करण्यात आले होते. त्यावर सरकारने चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले मात्र सरकारने ही समिती लवकर स्थापन करावी आणि या प्रकरणाची माहिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

  स्वबळावर लढण्याचा पुनरुच्चार
  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा पुनरुच्चार करत पटोले म्हणाले की, निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारीही आम्ही सुरू केली आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे पालन सर्वांनाच करावे लागते. त्यामुळे सगळे नेते त्यासाठी तयार आहेत, असे ते म्हणाले.