आव्हाडांच्या फोन टॅपिंगची चौकशी करा; सोमय्यांची गृहमंत्र्याकडे मागणी

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. किरिट सोमैय्या यानी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे फोन आणि व्हॉट्सअॅप टॅपिंग होत असल्याबाबत गांभिर्य लक्षात घेवून गृहमंत्र्याना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमैय्या म्हणाले की स्वत: आव्हाड यांनीच ट्विट करून सांगितले आहे.

    मुंबई (Mumbai).  भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. किरिट सोमय्या यानी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे फोन आणि व्हॉट्सअॅप टॅपिंग होत असल्याबाबत गांभिर्य लक्षात घेवून गृहमंत्र्याना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमैय्या म्हणाले की स्वत: आव्हाड यांनीच ट्विट करून सांगितले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी माझी मागणी आहे.

    घाटकोपरमध्ये रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे हिला सहा वर्षानंतर तिच्या हातांची पुन्हा हालचाल करणे शक्य झाले आहे. तिला या साठी डॉ. सोमय्या यांनी सात त्याने मदतीचा हात दिला होता. सोमैय्या यांनी तिच्या निवास स्थानी भेट घेतल्यानंतर सांगितले की, तिच्या हातांची हालचाल सुरू झाली ही आनंदाची बाब आहे. यावेळी पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले.

    पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करा (Reduce taxes on petrol-diesel)
    महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २७ रुपये घेत आहे. ठाकरे सरकारने हा कर कमी करावा. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी करून नागरिकांना आनंदाची बातमी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.