फक्त याच सरकारने नाही तर…. ठाकरे सरकारसह फडणवीसांवर IPS अधिकारी संजय पांडेंचा गंभीर आरोप

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील निलंबित एपीआय सचिन वाझे अटकेनंतर पोलीस प्रशासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे अनेक अधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे.

    मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील निलंबित एपीआय सचिन वाझे अटकेनंतर पोलीस प्रशासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे अनेक अधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे.

    बदली झालेले ज्येष्ठ IPS अधिकारी संजय पांडे यांनी सरकारविरोधात आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या कारभाबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. फक्त उद्धव ठाकरे सरकारच नाही, तर याआधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने देखील आपल्यावर अन्यायच केला असल्याचा गंभीर आरोप पांडे यांनी केला आहे.

    पांडे यांच्या प्रतिक्रियेमुळे पोलिसांवर सरकारचा दबाव असल्याची चर्चा रंगलेय. राज्याच्या विद्यमान सरकारची कृती ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना धरून नाही”, असा थेट आक्षेप संजय पांडेंनी उपस्थित केला आहे.