आयपीएस विनय तिवारी यांना केले क्वारंटाईनमुक्त, २४ तासात परतणार बिहारला

  • बिहार शहर पोलीस अधिक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यामुळे बिहार सरकारने मुंबई पालिकेवर अक्षेप घेतला आहे. अखेर विनय तिवारींची पालिकेने क्वारंटाईनमधून मुक्तता करण्यात आली आहे. तसेच त्यांना दोन दिवसांत मुंबई सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाविषयी तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे आयपीएस पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई पालिकेने क्वारंटाईन केले होते. त्यांना मुंबई पालिकेने बळजबरीने क्वारंटाईन होण्यास भाग पाडले. त्यामुळे मुंबई पालिकेवर सडकून टीका करण्यात आली होती. या प्रकरणावरुन काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले होते. 

बिहार शहर पोलीस अधिक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यामुळे बिहार सरकारने मुंबई पालिकेवर अक्षेप घेतला आहे. अखेर विनय तिवारींची पालिकेने क्वारंटाईनमधून मुक्तता करण्यात आली आहे. तसेच त्यांना दोन दिवसांत मुंबई सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

आयपीएस विनय तिवारी हे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले होते. परंतु महाराष्ट्रात पोहचाताच त्यांना मुंबई माहापालिकेने कोरोना पार्श्वभूमिवर क्वारंटाईन केले. त्यांना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचे समजत आहे. या प्रकारामुळे बिहारच्या सरकारने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे विनय तिवारी यांना बिहार सरकारने परत पाठविण्याची मागणी केली. 

या मागणीमुळे मुंबई पालिकेने विनय तिवारी यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे. तसेच त्यांना २ दिवसांत मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. सुशांत सिग राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआयने रिया चक्रवर्तीसह एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.