Sharad Pawar, don't lie too much ... Sadabhau will attack Pawar nrvk

शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले, असा सवाल उपस्थित करत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सदाभाऊ खोत, कडकनाथ कोंबडीवाले असे म्हणत या वयात शरद पवारांनी कुस्ती खेळणं अपेक्षित आहेत का? असा सवालच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी उपस्थित केला आहे.

    मुंबई : शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले, असा सवाल उपस्थित करत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सदाभाऊ खोत, कडकनाथ कोंबडीवाले असे म्हणत या वयात शरद पवारांनी कुस्ती खेळणं अपेक्षित आहेत का? असा सवालच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी उपस्थित केला आहे.

    सदाभाऊ खोत हे कोणाच्या बाबतीत बोलतात, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काळात क्रिकेटचे ट्वेंटी-ट्वेंटी सामने सुरु झाले. पवार साहेबांच्या कार्यकाळात वर्ल्ड कप सुरु झालं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तरी गाव पातळीवर खेळले आहेत, असंही मेहबूब शेख म्हणाले.

    तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, तिथले पवारसाहेब संस्थापक आहेत. या वयात त्यांनी कुस्ती खेळणं सदाभाऊंना अपेक्षित आहेत का? सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, कोणाच्या बाबतीत काय बोलावं ते त्यांना समजत नाही. ते काहीही बोलू शकतात असंही मेहबुब शेख यांनी म्हटलं आहे.