Is the decision of CMOMaharashtra state government to implement #dresscode in government offices right

कार्यालयात कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल असे कपडे घालत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

मुंबई : सरकार दरबारी काम करणाऱ्यांनाही आता ड्रेसकोडचे बंधन(dresscode for government officers and workers) घालण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत,याबाबतचे निर्देश राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल असे कपडे घालत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

सरकारी कार्यालयात #dresscode लागू करण्याचा @CMOMaharashtra चा निर्णय योग्य आहे का? तुमचं उत्तर नोंदविण्यासाठी येथे मतदान करा.