हीच तुमची लोकशाही आहे का? नड्डांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मुंबई : राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.

ट्विट करत त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. हीच तुमची लोकशाही आहे का?  असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना केला आहे.

नड्डा आणि कैलाश विजतवर्गीय यांच्यावरील भ्याड आणि लाजीरवाण्या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसच्या गुंडाचा हात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली.