BMC

कोणत्याही विभागातील खड्ड्यांबाबत तक्रार आल्यानंतर ४८ तासांच्या कालावधीत तो खड्डा बुजविण्याचे निर्देश अभियंत्यांना दिले जातात. दोन आठवड्यांपासून मुंबईत सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक विभागांमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने पादचारी आणि वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

  मुंबई : वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि त्यानंतर मुंबईत झालेली अतिवृष्टी यामुळे मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांच्या आतापर्यंत ४७१ तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत खड्ड्यांच्या तक्रारीत ४० टक्के वाढ दिसून आली आहे. यापैकी ३४३ खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

  मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत कोटयवधी रुपयांचा चुराडा केला आहे. मात्र दरवर्षी मुंबईत मुसळधार पावसानंतर रस्त्यांची चाळण होत आहे. यावर्षीचा पावसाळाही त्यास अपवाद नाही. सन २०२० मध्ये पावसाळ्यातील सुरुवातीच्या दोन महिन्यांत खड्ड्यांबाबत ३१५ तक्रारी आल्या होत्या. मात्र यावर्षी २७ जुलै रात्री आठ वाजेपर्यंत ५९६ तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. यामध्ये पालिका व्यतिरिक्त अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारीतील रस्त्यांचाही समावेश आहे. महापालिकेचे अ‍ॅप, सोशल मीडिया व ई मेलद्वारे खड्ड्यांबाबत नागरिक तक्रार करू शकतात.

  कोणत्याही विभागातील खड्ड्यांबाबत तक्रार आल्यानंतर ४८ तासांच्या कालावधीत तो खड्डा बुजविण्याचे निर्देश अभियंत्यांना दिले जातात. दोन आठवड्यांपासून मुंबईत सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक विभागांमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने पादचारी आणि वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

  गेल्या वर्षी जून, जुलै महिन्यांत ३१५ खड्ड्यांच्या तक्रारी आल्या होत्या. तर या वर्षी याच कालावधीत विभागस्तरावर ४७१ तक्रारी आल्या आहेत. मुंबईत २०५५ किलोमीटर रस्त्याचे जाळे आहे. खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक विभागस्तरावर दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी मोठे खड्डे बुजवण्यासाठी दीड कोटी तर छोटे खड्डे बुजवण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  या विभागातील रस्त्यांचे तीन तेरा

  मालाड, अंधेरी पश्चिम, कुर्ला, चेंबूर आणि भांडुप या विभागांतील खड्ड्यांच्या तक्रारी अधिक आहेत.आता पालिकेने खडडे बुजवले असले तरी गणेशोत्सव काळात आणखी खडडे पडल्याच्या तक्रारी गणेशभक्तांकडून होत असतात. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खडडे बुजवताना ते पुन्हा पडू नयेत याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  It has never been done so fast the rains have left potholes in Mumbai bmc received 471 complaints 343 potholes filled