छत्रपतींचे नाव बदलून अदानींचे नाव देणे ही मोठी चूक; मंत्री नवाब मलिक यांचा संताप

म्हणे, अदानीकडे विमानतळाच्या मॅनेजमेंटचा अधिकार, नाव बदलण्याचा नाही! विमानतळाचे नाव बदलले म्हणून तोडफोड करणे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांची संस्कृती आहे का? वाद शांततापूर्ण मार्गाने सोडविता आला असता; मग् तोडफोड करण्याची गरजच का भासली? सोशल मीडियावर रंगाताहेत चर्चा......

    मुंबई (Mumbai). छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे (Chhatrapati Shivaji Maharaj Airport) नाव बदलून अदानी विमानतळ (Adani Airport) करणे योग्य नाही ही अदानींची सर्वांत मोठी चूक आहे.

     

    राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते (Chief National Spokesperson of the Nationalist Congress Party) (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी व शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नांव बदलून अदानी एअरपोर्ट करावे. त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा अधिकार आहे. परंतु नाव बदलण्याचा व नाव ठेवण्याचा अधिकार नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

    अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तशी घटना त्याठिकाणी घडली आहे. अदानीने लोकांची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.