sanjay raut

स्वतःमतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या (Religion) भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला (Hindutva) सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळ्ल्यावर ज्यांनी आपले हात वर केले त्यांनी हिंदुत्वाबाबत वक्तव्य करणे म्हणजे विनोदच आहे.

मुंबई : भाजप (BJP)णि ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Government) हिंदुत्वाच्या मुद्यावर वाकयुद्ध पेटले आहे. दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धा (Ajan competition) आयोजित केली आहे. यावरुन भाजपने हिंदुत्वावर (Hindutva) सवाल केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखात यावर भाष्य करत भाजपवर चांगलेच ताशेरो ओढले आहेत. अजान प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत. त्यांच्या दातांत ईदच्या शिरकुरम्याची आणि बिर्याणीची शिते अडकल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडेही वळली असल्याचे भान राखा. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

स्वतःमतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाये कोसळ्ल्यावर ज्यांनी आपले हात वर केले त्यांनी हिंदुत्वाबाबत वक्तव्य करणे म्हणजे विनोदच आहे. भाजपचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत असते. तसेच आता अजानप्रकरणावर फसफसत आहे.

भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन शिवसेनेवर चिखलफेक शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम बांधवांच्या एका स्वयंसेवी संस्थेने आयोजिलेल्या अजान स्पर्धेचे काैतुक केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सध्या कोविडचा प्रकोप आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवात गर्दी करू नये हे राष्ट्राचे व राज्याचे संकेत आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील बहुसंख्य भागात मुस्लिमांची वस्ती आहे. त्यांनीही खाली उतरून गर्दी करू नये. जे काही उपक्रम, उत्सव साजरे करायचे आहेत ते ‘ऑनलाइन’ म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून करा.

शिवसेना याकामी आपल्याला मदत करेल. हा विषय एवढय़ापुरता आणि इतकाच मर्यादित असताना भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला. त्यांनी यावर असा अपप्रचार सुरू केला की, ‘पहा, काय सुरू आहे. शिवसेनेने भगवा सोडला, हिंदुत्वाला मूठमाती दिली. शिवसेना मतांसाठी लांगूलचालन करीत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व तकलादू आहे’. ‘अजान’प्रकरणी शिवसेनेवर अशी चिखलफेक करणे म्हणजे दिल्लीतील सीमेवरील शीख शेतकऱयांना पाकिस्तानी अतिरेकी म्हणण्यासारखेच आहे.